जे लोकं ड्रग्जशी संबंधित असतात त्यांना सोडलं नाही पाहिजे, ठेचून काढलं पाहिजे. यात दुमत असण्याचं काहीही कारण नाही. काँग्रेसचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे नशेच्या पदार्थांचे लायसन्स आहेत. मुळात राजकीय नेते, आमदार, खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांकडे नशेच्या पदार्थांचं लायसन्स नसलं पाहिजे. तसा नियमच पाहिजे. दारुविक्रीचे परवाने असलेले काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यांची यादीच माझ्याकडे आहे, असा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. (Sudhir Mungantiwar)
मुनगंटीवार पुढे म्हणाले की, दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांना टार्गेट केलं आहे. त्यातच मुनगंटीवार यांनी थेट काँग्रेसवर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेबाबात मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले, एखाद्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा व्यक्त करण्यात गैर काहीच नाही. अपात्रतेच्या सुनावणीत काही अघटीत घडायचंच असेल तरी त्याचा मुख्यमंत्रीपदाशी काहीच संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंच आहे की विधानपरिषदेचा मार्ग मोकळा आहे. एकनाथ शिंदेंच्याच माध्यमातून २०२४ च्या निवडणूका लढवणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
(हेही वाचा : Eknath Khadase : एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका; एअर अॅम्ब्युलन्सने तातडीने मुंबईत रवाना)
शिवाजी महाराजांची माहिती देणारं जगातील सर्वात मोठं संग्रहालय तयार करणार
भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सोमवारी अनावरण होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह आम्ही पुतळ्याचं अनावरण करणार आहोत असे मुनगंटीवार म्हणाले. आम्ही पुणेकर या संस्थेच्या मदतीनं ४१ आरआर बटालियन -कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभा केला आहे. सीमेवरील सैन्य दररोज या पुतळ्याची पूजा करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार किंवा दृक-श्राव्य पद्धतीचा अनोखा पुतळा नव्या संसद भवनात उभारण्याचा मानस असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे ३५० वं वर्ष असल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यात शिवाजी महाराजांची माहिती देणारं जगातील सर्वात मोठं संग्रहालय तयार करणार आहे. तर लंडनमधील वाघनखे लवकरच दर्शनाकरता राज्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
हेही पहा –