छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे (Sudhir Mungantiwar) ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार रविवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रात्री रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतीक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पूरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हे मुनगंटीवार यांच्या सोबत असतील. (Sudhir Mungantiwar)
(हेही वाचा – Elections : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार ?; यंत्रणा विकसित करण्याच्या हालचाली)
एक ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ब्रिटिश एअरवेज च्या विमानाने लंडन कडे रवाना होण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. यावेळी विविध संघटना, मंडळे, संस्था तसेच महाराष्ट्र सरकार मध्ये सहाभागी मित्र पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहतील. (Sudhir Mungantiwar)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटन च्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता. (Sudhir Mungantiwar)
या दौऱ्यात लंडन येथील टॅव्हिस्टॊक चौक येथे 2 ऑक्टोबर ला गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास मुनगंटीवार उपस्थित रहातील. तेथील विविध भारतीय तथा महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून ना मुनगंटीवार चर्चा करणार असून; मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहलायचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वक्षऱ्या होतील. यानंतर लगेच दूरदृश्याप्रणालीद्वारे पत्रकार परिषद होणार असून संस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पत्रकारांशी संवाद साधतील.
या दौऱ्यात सुधीर मुनगंटीवार हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या लंडन येथील निवासस्थानास भेट देणार असून या महामानवास अभिवादन करतील. (Sudhir Mungantiwar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community