दिव्यांगांच्या योजना राबवण्यासाठी दिव्यांगांकडूनच मागवणार सूचना

177

महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका दिव्यांगांच्या सर्व योजना गरजूंपर्यंत सुरळीतपणे पोहोचाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. याअनुषंगाने, कोविड १९ चा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे संथगती प्राप्त झालेल्या योजनांना उभारी देण्यात येईल. यासाठी दिव्यांगांशी संपर्क वाढवून ज्या योजना दिव्यांगांच्या दृष्टीने लाभदायक आहेत, त्या राबविण्याबाबत दिव्यांगाकडून आता सूचना मागविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : माघी गणेशोत्सवाबाबत महापालिकेला उशिरा जाग )

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाद्वारे सामजिक, क्रिडा व इतर क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यांगांचा सत्कार समारंभ रविंद्र नाट्यगृह, प्रभादेवी येथे मंगळवारी २४ जानेवारी, २०२३ आयोजित करण्यात आला होता, यावेळी बोलतांना जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त (नियोजन) प्रशांत सपकाळे यांनी दिव्यांग व्यक्ती हा समाजातील महत्वपूर्ण घटक आहे. समाजातील त्यांचे स्थान इतरांप्रमाणेच आहे. महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. दिव्यांगांच्या उत्थानासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या आर्थिक वर्षातही दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ज्ञानार्जनासहित अर्थार्जन होऊ शकेल अशा योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन. प्रशांत सपकाळे यांनी केले.

ते म्हणाले, महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका दिव्यांगांच्या सर्व योजना गरजूंपर्यंत सुरळीतपणे पोहोचाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. यानुषंगाने, कोविड १९ चा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे संथगती प्राप्त झालेल्या योजनांना उभारी देण्यात येईल. यासाठी दिव्यांगांशी संपर्क वाढवून ज्या योजना दिव्यांगांच्या दृष्टीने लाभदायक आहेत त्या राबविण्या बाबत सूचना मागविण्यात येतील असेही सपकाळे यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिका दिव्यांगाच्या उत्कर्षासाठी तरतूद केलेल्या निधीपेक्षा कितीतरी जास्त निधी खर्च करुन सर्वपरिने मदत करित आहे. यापुढील काळातही विविध योजनांच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळेल, उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल, अशा योजना दिव्यांगाच्या कल्याणासाठी मुंबई महानगरपालिका राबविण्यास कटिबध्द असल्याची ग्वाही सपकाळे यांनी दिली.

याप्रसंगी जी -उत्तर विभागाच्या समाज विकास अधिकारी वैदिका साळुंखे-पाटील, सरला राठोड, विभा जाधव आदींच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींचा शाल व श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सत्कारमूर्ती, दिव्यांग व्यक्ती आदी उपस्थित होते.

‘दिव्यांग अंध बांधवांसाठी चित्रांचे प्रदर्शन’

दिव्यांग अंध बांधवांसाठी आयोजित केलेले चित्रांचे प्रदर्शन हे मुख्य आकर्षण ठरले. “ऍक्सेसिबल इंडिया – मूलभूत सुविधा सर्वांसाठी” या योजनेच्या पुढे एक पाऊल टाकत कलेच्या माध्यमातून दिव्यांगांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं महत्वपूर्ण कार्य चित्रकार चिंतामणी हसबनीस करत आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन रवींद्र नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. यातील ‘द वॉल’, बॉर्डर, पोर्ट्रेट ऑफ अजिंक्य, लता इन पोर्ट्रेट्स इत्यादी निवडक चित्रांवर आधारित विश्लेषण करण्यात आले.

New Project 8 6

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.