सोमवारी, ३१ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने सकाळी वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी मारली, त्याचा शोध सुरु आहे. शोध मोहिमेसाठी भारतीय नौदलासह मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुलावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.
भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वांद्रे-वरळी सी-लिंक येथे वाहतूक कोंडी झाली. भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर पुलाजवळ शोध मोहिम करत आहेत. सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस नसतानाही वांद्रे-वरळी सीलिंकवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाल्याची नोंद झाली, ट्रॅफिक बद्दलची माहिती लोकांनी ट्विटरवर शेअर केली. मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर त्यांच्या तक्रारींमध्ये बीएमसी आणि अधिकाऱ्यांना टॅग केले. प्रवाशांना या घटनेची कल्पना नव्हती.
(हेही वाचा Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे मुंबईकडे लक्ष; ठाणे, कल्याण आणि पालघरकडे दुर्लक्ष)
Join Our WhatsApp Community