एसटीत आत्महत्येचे सत्र सुरूच! २३व्या आत्महत्येने महामंडळ हादरले!

अनियमित वेतनामुळे कर्मचारी त्रस्त अनियमित वेतनामुळे उमरगा आगाराचे वाहक दयानंद गवळी यांनी मंगळवारी, १२ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली.

100

एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर अद्याप राज्य सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढला नाही. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतनासाठी संघर्ष करावा लागत आहे. तब्बल १५ ते २० दिवस वेतन उशिराने मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना सांसारिक संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता महामंडळात सुरु झालेले आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.

२३व्या आत्महत्येने महामंडळ हादरले!

अनियमित वेतनामुळे कर्मचारी त्रस्त अनियमित वेतनामुळे उमरगा आगाराचे वाहक दयानंद गवळी यांनी मंगळवारी, १२ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तुळजापूर जुने बस स्थानकाजवळ आढळून आला. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले महामंडळ कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे आणखी आर्थिक खाईत लोटल्यामुळे आता महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही जिकरीचे बनले आहे. जेव्हा राज्य सरकार पैसे देईल तेव्हा कर्मचाऱ्यांचे वेतन होईल, अशी सध्याची स्थिती आहे. म्हणूनच कर्मचाऱ्यांची आर्थिक हेळसांड होत आहे. त्यामुळे याला कंटाळून ७ मार्च २०२० रोजी महामंडळामध्ये पहिली आत्महत्या झाली होती. हे आत्महत्येचे सत्र आजही सुरूच आहे. १९ महिन्यांपासून मंगळवारी २३ वी आत्महत्या झाली आहे.

आत्महत्या ह्या कुणी खुशीने करीत नाही. कमी वेतनामुळे कर्मचारी त्रस्त आहे. कौटुंबिक खर्च भागत नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळ आता शासनाने चालवले पाहिजे. तरच हा प्रश्न कायमचा सुटेल.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

सरकारकडून दुर्लक्ष 

या आधीही महामंडळातील कर्मचारी संघटनांनी याविषयी राज्य सरकारला कायम जाणीव करून दिली. अनियमित वेतनामुळे एस.टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत एस.टी. महामंडळातील कर्मचार्‍यांना नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात आहेत. कुटुंबाचे अर्थचक्र संकटात सापडल्याने नाईलाजाने एस.टी. कर्मचार्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे सुरू केले आहे. अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी सुद्धा जळगाव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या केल्या आहेत, असे गाऱ्हाणे सरकारसमोर मांडले आहे. मात्र तरीही महामंडळाकडून दाखल घेतली जात नसल्याने दुर्दैवाने आत्महत्या सत्र सुरूच आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.