सासरच्यांच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

85

सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचे आपण ब-याचदा ऐकले असेल. पण पुणे शहरात सासरच्यांच्या जाचाला कंटाळून एका पुरुषाने आत्महत्या केली आहे. एका २९ वर्षीय तरुणाने रविवारी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सुगम चाळीत राहणा-या निखिल धोत्रे याने आपल्या बायकोच्या ओढणीने फास लावून आत्महत्या केली आहे. घटनास्ठळी एक सुसाईड नोट सापडली असून, सासरच्या मंडळींकडून होणारा छळ तसेच, कर्जाचा बोजा वाढल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभराआधी निखिलचं लग्न झालं होतं. परंतु त्याचं आपल्या बायकोशी पटत नव्हतं. त्यांच्यात रोज भांडणं होत होती. तसेच सासरच्या मंडळींकडून त्याला मानसिक त्रास दिला जात होता. अखेर निखिलने टोकाचे पाऊल उचलत घरात कोणी नसताना फास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात सासरच्या लोकांकडून होणारा छळ तसेच कर्ज असल्याने या सगळ्या प्रकाराला त्रासून, आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने लिहिलं आहे. आपल्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक कारवाई करावी, असेही पत्रात म्हटले आहे.

आईसाठी भावनिक विधान 

आई तू काळजी करू नकोस. मी तुझ्यापोटी पुन्हा जन्म घेईन. माझ्या मुलाला सांभाळ, त्याची काळजी घे असं भावनिक विधानही त्याने केले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रुपेश टेमगिरे म्हणाले, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.