National Maritime Day निमित्त सुजाता सौनिक यांची महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली

54

राष्ट्रीय मेरीटाइम दिनानिमित्त (National Maritime Day) राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांनी इंडियन सेलर्स होम, मस्जिद बंदर, मुंबई येथे भेट देऊन प्रथम व द्वितीय महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्य सचिवांनी यावेळी संपूर्ण परिसराची पाहणी करून नौसैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचे कौतुक केले. तसेच त्यांनी समुद्री क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधून नौसैनिक व शिपिंग उद्योगाशी संबंधित विविध समस्यांविषयी जाणून घेतले.

(हेही वाचा – Donald Trump आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात हजारो अमेरिकन नागरिकांची रस्त्यावर उतरून निदर्शने !)

राष्ट्रीय मेरीटाइम दिन समारंभ (केंद्रीय) समितीच्या वतीने ६२ व्या राष्ट्रीय मेरीटाइम दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता. महासंचालक (शिपिंग) आणि केंद्रीय मेरी टाईम दिन समारंभ समितीचे अध्यक्ष श्याम जगन्नाथन, उप महासंचालक (शिपिंग) व समितीचे सदस्य सचिव डॉ. पी.के. राऊत आदी या समारंभास उपस्थित होते. शिपिंग क्षेत्रातील प्रतिनिधींनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. डॉ. राऊत यांनी यावेळी इंडियन सेलर्स होम सोसायटी (Indian Sellers Home Society) व स्मृती सभागृहाविषयी माहिती दिली.

वाढवण बंदराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करीत असल्याचे सांगून मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी उपस्थितांना मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या (Mumbai Port Authority) अधिपत्याखालील परिसराच्या भविष्यकालीन विकासासाठी नव्या कल्पना देण्याचे आवाहन केले. मुंबई परिसरात जहाज बांधणीसाठी सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने दिला आहे, या उपक्रमात समुद्री उद्योगाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. समुद्री शिक्षणाबद्दल जनजागृती वाढवण्याच्या उपक्रमांचे कौतुक करून मुंबईत कार्यरत असलेल्या विविध विदेशी दूतावासांना समुद्री उद्योगासोबत चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर आणण्याची त्यांनी तयारी दर्शवली.

इंडियन सेलर्स होम विषयी

इंडियन सेलर्स होम सोसायटी (Indian Sellers Home Society), मुंबई हे भारताच्या नौदलातील सागर वीरांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे, ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. ही इमारत मस्जिद बंदर सायडिंग रोड आणि ठाणे स्ट्रीट यांच्या दरम्यान असलेल्या जागेवर बांधण्यात आली आहे. या ‘होम’चा मुख्य भाग म्हणजे स्मृती सभागृह. या सभागृहाच्या भिंतींवर १२ कांस्य (ब्रॉन्झ) चे फलक लावलेले असून या फलकावर पहिल्या महायुद्धात प्राणत्याग केलेल्या भारतीय खलाशांची नावे दर्शविलेली आहेत.

या फलकांच्या वर खोदकाम केलेला एक कांस्य लेख आहे, ज्यात ‘येथे शाश्वत सन्मान आणि स्मरणार्थ २२२३ नौसैनिकांची नावे नोंदवली गेली आहेत – रॉयल नेव्ही, रॉयल इंडियन मरीन व मर्चंट नेव्ही- जे ग्रेट वॉरमध्ये वीरमरण पावले आणि ज्यांचे समाधीस्थळ म्हणजे समुद्र आहे.’ १९१४-१९१८.

हा फलक इंग्लंडमध्ये तयार करण्यात आला असून इंपीरियल वॉर ग्रेव्ह्ज कमिशन (Imperial War Graves Commission, आताचे कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्ज कमिशन) यांनी प्रदान केला आहे.

या ‘होम’चे बांधकाम नोव्हेंबर १९३० मध्ये सुरू झाले आणि १४ जानेवारी १९३१ रोजी तत्कालीन मुंबईचे राज्यपाल सर फ्रेडरिक ह्यू सायक्स यांच्या हस्ते पायाभरणी झाली.

कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्ज कमिशन ने १९६२ मध्ये हॉलमध्ये एक नवीन स्मारक जोडले, जे १९३९-४५ च्या दुसऱ्या महायुद्धात समुद्रात मृत्यू पावलेल्या रॉयल इंडियन नेव्हीचे ४३८ व भारतीय मर्चंट नेव्हीचे ६,०९३ अशा एकूण ६,५३१ खलाशांचे स्मरण करते. हे स्मारक हॉलच्या मध्यभागी काच झाकलेल्या कांस्य पेटीच्या स्वरूपात आहे. यामध्ये नावांचे पुस्तक आहे, जे मार्बलच्या पायथ्यावर ठेवलेले आहे. हे पुस्तक हिंदी भाषेत मुद्रित आहे. त्यावरील समर्पणात लिहिले आहे: ‘हे पुस्तक त्या ६५०० नौसैनिकांची व मर्चंट नेव्हीतील खलाशांची नावे धारण करते, जे आपल्या मातृभूमीसाठी सेवा करताना मृत्युमुखी पडले व ज्यांचे समाधीस्थळ केवळ समुद्र आहे.’

दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या ६५३१ खलाशांचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने होम बिल्डिंगच्या समोर एक तीन मजली इमारत उभारली, जी ७०० खलाशांच्या निवासासाठी आहे. ही इमारत सीमन्स हॉस्टेल म्हणून ओळखली जाते. निवास भाग दोन विंग्समध्ये विभागलेला असून दोन्ही इमारती मिळून १०१५ सागरी कामगारांना निवास देण्याची क्षमता आहे. (National Maritime Day)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.