मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुकीत ‘हिंदुस्थान पोस्ट’चे Sujit Mahamulkar कार्यकारणी सदस्य म्हणून विजयी

68
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुकीत 'हिंदुस्थान पोस्ट'चे Sujit Mahamulkar कार्यकारणी सदस्य म्हणून विजयी
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुकीत 'हिंदुस्थान पोस्ट'चे Sujit Mahamulkar कार्यकारणी सदस्य म्हणून विजयी

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत ‘हिंदुस्थान पोस्ट’ चे राजकीय संपादक सुजित महामूलकर कार्यकारिणी सदस्य म्हणून विजयी झाले आहेत. तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे दिलीप सपाटे (Dilip Sapate) तर सरचिटणीसपदी दैनिक लोकमतचे दीपक भातुसे (Deepak Bhatuse ) विजयी झाले आहेत. (Sujit Mahamulkar)

( हेही वाचा : Flower Festival : मुंबईतील पुष्पोत्सवाला सुरुवात; राणीबागेत सर्व प्रकारच्या फुलांची झाडे न्याहाळता आणि खरेदी करता येणार

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत ‘हिंदुस्थान पोस्ट’चे राजकीय संपादक सुजित महामुलकर (Sujit Mahamulkar) यांना १०२ मते मिळाली असून कार्यकारणी सदस्यांच्या सर्वाधिक मतांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कार्यकारणी सदस्यांमध्ये मनोज दुबे यांना १०४ मते मिळाली असून ते सर्वाधिक मते मिळवत पहिल्या क्रमांकांनी विजयी झाले. (Sujit Mahamulkar)

दरम्यान मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत सन २०२५ -२६ आणि २०२६- २७ अशा दोन वर्षासाठी संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. या निवडणुकीत कोषाध्यक्षपदी विनोद यादव ( दिव्य भास्कर), उपाध्यक्षपदी आलोक देशपांडे ( इंडियन एक्स्प्रेस) निवडून आले. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मनोज दुबे (Manoj Dubey) ( हमारा महानगर ) सुजित महामूलकर (Sujit Mahamulkar)( हिंदुस्थान पोस्ट), खंडूराज गायकवाड ( सांज महानगरी ), प्रशांत बारसिंग( नवराष्ट्र ) आणि राजन शेलार (Rajan Shelar) ( पुढारी) विजयी झाले आहेत. (Sujit Mahamulkar)

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ निवडणूक निकाल
एकूण मतदार १८०
झालेले मतदान १६८ (९३ टक्के)

अध्यक्ष (१ जागा)
१. दिलीप सपाटे : १२४ (विजयी)
२. दिलीप जाधव : ३७ (पराभूत)
नोटा : ७

उपाध्यक्ष (१ जागा)
१. अलोक देशपांडे : ८० (विजयी)
२. ⁠राजू झनके : ४७ (पराभूत)
३. भगवान परब : ३४ (पराभूत)
नोटा : ७

सरचिटणीस (१ जागा)
१. दिपक भातुसे : ९५ (विजयी
२. प्रवीण पुरो : ६४ (पराभूत)
नोटा : ९

कोषाध्यक्ष (१ जागा)
१. विनोद यादव : १०१ (विजयी)
२. मिलिंद लिमये : ४६ (पराभूत)
३. प्रवीण राऊत : १६ (तांत्रिक माघार)
नोटा : ५

कार्यकारिणी सदस्य (५ जागा)

१. मनोज दुबे : १०४ (विजयी)
२. सुजित महामुलकर : १०२ (विजयी)
३. खंडूराज गायकवाड : १०० (विजयी)
४. प्रशांत बारसिंग : ९१ (विजयी)
५. राजन शेलार : ८७ (विजयी)
६. नेहा पुरव : ८३ (पराभूत)
७. अनंत नलावडे : ४५ (पराभूत)
८. रईस अन्सारी : ३७ (पराभूत)
नोटा : ४
अपात्र: १

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.