Sukanya Samriddhi Interest Rate : सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर वाढला

सरकारने शेवटच्या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर ८ वरून ८.२० टक्क्यांवर आणला आहे. 

175
Sukanya Samriddhi Interest Rate : सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर वाढला
Sukanya Samriddhi Interest Rate : सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर वाढला
  • ऋजुता लुकतुके

सरकारने शेवटच्या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेवरील (Sukanya Samriddhi Yojana) व्याजदर ८ वरून ८.२० टक्क्यांवर आणला आहे. (Sukanya Samriddhi Interest Rate)

सरकारी योजनांवरील सुधारित व्याजदर शुक्रवारी सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत. आणि त्यानुसार, सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) या सरकारच्या फ्लॅगशिप योजनेवरील (Flagship scheme) व्याजदर जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीत २० अंशांनी वाढवण्यात आले आहेत. सुधारित व्याजदर ८.२ टक्के इतका असेल. (Sukanya Samriddhi Interest Rate)

(हेही वाचा – Tesla Factory in Gujarat : टेस्लाचा पहिला कार कारखाना गुजरातमध्ये)

३ वर्षं मुदतीच्या मुदतठेवीवरील व्याजदरही ७.१ टक्क्यांवर आणले आहेत. अर्थ मंत्रालयाने नवीन पत्रक काढून सुधारित दरांची घोषणा केली आहे. हे दर अर्थातच १ जानेवारीपासून लागू होतील. (Sukanya Samriddhi Interest Rate)

New Project 2023 12 30T155313.988

सरकारच्या महत्त्वाच्या सर्व बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा सरकारकडून दर तीन महिन्यांनी घेतला जातो. आणि तिमाहीच्या शेवटच्या महिन्यात त्यात काही बदल असल्यात ते निश्चित केले जातात. आणि जनतेला तसं कळवण्यात येतं. यावेळी फक्त दोन योजनांचे व्याजदर बदलले आहेत. (Sukanya Samriddhi Interest Rate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.