श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे (National Rajput Karni Sena) राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांची जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवार, 5 डिसेंबर रोजी भर दिवसा स्कूटीस्वार आरोपींनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला. यानंतर आरोपी पळून गेले. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. गोगामेडी यांच्यासोबत उपस्थित असलेले अजित सिंह हेही गंभीर जखमी झाले आहेत.
(हेही वाचा – BJP : उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का?; भाजपचा टोला)
चकमकीत एक हल्लेखोर ठार
सुखदेव सिंह गोगामेडी हे दीर्घकाळ राष्ट्रीय करणी सेनेशी (Karni Sena) संबंधित होते. करणी सेना संघटनेतील वादानंतर त्यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन केली होती. गोगामेडी त्याचे अध्यक्ष होते.
VIDEO | CCTV footage shows two men firing multiple shots at Rashtriya Rajput Karni Sena president Sukhdev Singh Gogamedi and another man standing at the door.
Gogamedi died, while one of his security personnel and another person were injured in the firing.
(Disclaimer: PTI… pic.twitter.com/2W4TQely7C
— Press Trust of India (@PTI_News) December 5, 2023
जयपूरचे पोलीस आयुक्त बी. जी. जॉर्ज जोसेफ म्हणाले, ”हल्लेखोर कोण होते, याची माहिती मिळाली आहे. हल्लेखोरांच्या मागावर गेलेल्या पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक हल्लेखोर ठार झाला आहे. नवीन सिंह शेखावत असं त्याचं नाव असून तो जयपूरच्या शाहपुरा येथील रहिवासी होता. शाहपुरात त्याचे एक छोटे दुकान आहे. इतर दोन हल्लेखोर रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीची स्कूटर घेऊन पळून गेले.”
(हेही वाचा – Underground Garbage Bins : महापालिका रुग्णालय परिसरात भूमिगत कचरापेट्या)
बोलता बोलता झाडल्या गोळ्या
सुखदेव सिंग गोगामेडी हे दुपारी 1.45च्या सुमारास श्याम नगर जनपथवरील घराबाहेर उभे होते. हल्लेखोरांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकाशी बातचित केली. गोगामेडी घरात असल्याची माहिती घेतली आणि मग ते घरात घुसले. आत जाऊन ते गोगामेडी यांच्याशी बोलत होते. बातचीत सुरू असतांनाच हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
2017 मध्ये जयगडमध्ये पद्मावत (Padmaavat) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजपूत करणी सेनेच्या लोकांनी तोडफोड केली होती. चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही थप्पड मारण्यात आली होती. गोगामेडी चित्रपट पद्मावत आणि गँगस्टर आनंदपाल एन्काउंटर प्रकरणानंतर राजस्थानमध्ये (Rajasthan) झालेल्या निदर्शनांमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community