विदर्भासह राज्यभरात एके ठिकाणी अवकाळी पाऊस , तर दुसरीकडे उकाड्यामुळे काहिली होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्याचा फटका विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत जाणवत आहे. वाढत्या तापमानाची झळ बसून मार्च महिन्यात ३३ जाणांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Summer Care)
वाढत्या तापमानाबाबत आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले की, राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जिवितहानी लक्षात घेऊन लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारितील आरोग्य यंत्रणांनी व्यापक सर्वेक्षण करणे तसेच उष्णतेसंदर्भातील आजारांचे सर्वेक्षण करून नियमितपणे आपले अहवाल आरोग्य विभागाच्या पोर्टलवर संकलित करण्यास सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – IPL 2024 Hardik Pandya : हार्दिक पांड्याला ट्रोलिंग करणाऱ्यांना खरंच मुंबई पोलीस स्टेडिअम बाहेर काढणार?)
उन्हाळ्यात काळजी घेण्याबाबत सूचना…
तापमान वाढल्यामुळे होणाऱ्या विकारांबाबत उपाययोजना देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात कोणते कपडे परिधान करावेत, आहार तसेच निरोगी आरोग्यासाठी आहारविषयक सूचना याविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या डेथ ऑडिट समितीकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community