Summer Special Train: उन्हाळ्यात मध्य रेल्वे सोडणार ३३२ विशेष गाड्या; वेळापत्रक पहा एका क्लिकवर

71

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) मुंबई-नागपूर-करमळी–तिरुअनंतपुरम, पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान ३३२ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या (Railway) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Summer Special Train)

(हेही वाचा – Aurangzeb याची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल)

सोमवारपासून आरक्षण खुले
५ एप्रिल ते २९ जूनपर्यंत धावणाऱ्या विशेष गाड्यांचे आरक्षण २४ मार्चपासून खुले होणार आहे. विशेष गाड्यांचे थांबे, वेळा आणि डब्यांची संरचना यांच्या सविस्तर माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

(०२१३९/४०) सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी (५० फेऱ्या)
०२१३९ विशेष गाडी सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि आणि नागपूरमध्ये त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास (०२१४०) नागपूरहून रात्री ८ वाजता सुरू होईल आणि सीएसएमटीमध्ये दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता गाडी पोहोचेल.

(०११५१/२) सीएसएमटी-करमाळी-सीएसएमटी (१८ फेऱ्या)
०११५१ विशेष गाडी सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि करमाळी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास (०११५२) करमाळी येथून दुपारी २.१५ वाजता सुरू होईल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३.४५ वाजता पूर्ण होईल.

(हेही वाचा – Bangladesh मधील हिंसाचारामागे राजकीय नाही तर धार्मिक कारणेही; सहसरकार्यवाह अरुण कुमार यांचे विधान)

(०११२९/३०) एलटीटी-करमाळी- एलटीटी (१८ फेऱ्या)
०११२९ विशेष गाडी एलटीटी येथून रात्री १०.१५ वाजता सुटणार असून करमाळी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचणार आहे. परतीचा प्रवास (०११३०) करमाळी येथून दुपारी २.३० वाजता सुरू होईल आणि एलटीटीमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पूर्ण होईल.

(०१०६३/४) एलटीटी-थिरुवनंतपुरम-एलटीटी (१८ फेऱ्या)
०१०६३ विशेष गाडी एलटीटी येथून दुपारी ४ वाजता सुटणार असून थिरुवनंतपुरम येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास (०१०६४) थिरूवनंतपुरम येथून दुपारी ४.२० वाजता सुरू होईल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.४५ वाजता पूर्ण होईल.

(हेही वाचा – Dharavi Redevelopment Project : माटुंगा रेल्वे स्थानकाशेजारील रेल्वेच्या जागेवर रचली जाणार धारावीच्या विकासाची विट)

(०११०५/६) एलटीटी-नांदेड-एलटीटी (२४ फेऱ्या)
०११०५ विशेष  (Special train) गाडी एलटीटी येथून मध्यरात्री १२.५५ वाजता सुटणार असून, नांदेड येथे त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास (०११०६) नांदेडहून रात्री ८ वाजता सुरू होईल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता पूर्ण होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.