प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कानपूर दरम्यान २६ साप्ताहिक विशेष गाड्या आणि पुणे ते वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान २६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालविणार आहे. तपशील खालीलप्रमाणे :
लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर सुपरफास्ट स्पेशल (२६ फेऱ्या)
- 04152 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ८.४.२०२३ ते १.७.२०२३ (१३ फेऱ्या) पर्यंत दर शनिवारी १७.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १५.२५ वाजता कानपूर सेंट्रलला पोहोचेल.
- 04151 स्पेशल कानपूर सेंट्रल येथून दि. ७.४.२०२३ ते ३०.६.२०२३ (१३ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी १५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १४.५५ वाजता पोहोचेल.
- थांबे : भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज आणि फतेहपूर
- संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ७ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन
( हेही वाचा: मोठी बातमी: मध्य रेल्वेच्या लोकलला आग; प्रवाशांनी काढला पळ ) पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन स्पेशल ट्रेन (२६ फेऱ्या)
- 01921 स्पेशल पुणे येथून दि. ६.४.२०२३ ते २९.६.२०२३ (१३ फेऱ्या) पर्यंत दर गुरुवारी १५.१५ वाजता सुटेल आणि वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ०९.३५ वाजता पोहोचेल.
- 01922 स्पेशल वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन येथून दि. ५.४.२०२३ ते २८.६.२०२३ (१३ फेऱ्या) पर्यंत दर बुधवारी १२.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
- थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बिना आणि ललितपूर.
- संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन.
- आरक्षण : विशेष गाडी क्र. 04152 आणि 01921 साठी बुकिंग विशेष शुल्कासह दि. १७.२.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
- या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.