उन्हाळ्यात अनेकजण गावी जातात, तसेच या कालावधीमध्ये शाळांनाही सुट्ट्या असतात याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते दानापूर दरम्यान विशेष शुल्कसह 18 सुपरफास्ट/एक्स्प्रेस साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे – दानापूर साप्ताहिक सुपरफास्ट/एक्स्प्रेस विशेष (18 ट्रिप)
- 01039 सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी पुण्याहून दिनांक 13 एप्रिल 2022 ते 08 जून 2022 पर्यंत (9 ट्रिप) दर बुधवारी 21.30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 04.30 वाजता दानापूरला पोहोचेल.
- 01040 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 15 एप्रिल 2022 ते 10 जून 2022 पर्यंत (9 ट्रिप) दर शुक्रवारी दानापूर येथून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 18.45 वाजता पुण्याला पोहोचेल.
- थांबे – अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, अलाहाबाद छिओकी जंक्शन, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा
- संरचना: एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, चार वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 10 स्लीपर क्लास आणि 6 सामान्य द्वितीय श्रेणी डबे
लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर जंक्शन द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (36 ट्रिप्स)
- 01043 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 10 एप्रिल 2022 ते 09 जून 2022 पर्यंत (18 ट्रिप) दर रविवारी आणि गुरुवारी 12.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.15 वाजता समस्तीपूर जंक्शनला पोहोचेल.
- 01044 विशेष गाडी समस्तीपूर जंक्शन येथून दिनांक 11 एप्रिल 2022 ते 10 जून 2022 पर्यंत (18 ट्रिप) दर सोमवारी आणि शुक्रवारी 23.30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 07.40 वाजता पोहोचेल.
- थांबे – कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, अलाहाबाद छिओकी जंक्शन, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र जंक्शन, हाजीपूर जंक्शन, मुझफ्फरपूर जंक्शन.
- संरचना: एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, पाच वातानुकुलीत तृतीय श्रेणी, एक वातानुकुलीत तृतीय श्रेणी इकॉनॉमी, 10 स्लीपर क्लास आणि 3 सामान्य द्वितीय श्रेणी डबे
आरक्षण सुविधा
या गाड्यांची बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
Join Our WhatsApp Community