उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की, मुंबईतील चाकरमानी वर्ग सहकुटुंबासह गावची वाट धरतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाडदरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांच्या ९२ फेऱ्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम दरम्यान रेल्वे गाड्यांच्या २० फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. १६ मे ते ३० जून दरम्यान मनमाड मार्गावर आणि ६ मे ते २५ मे दरम्यान थिवीम मार्गावर या गाड्या धावणार आहेत.
( हेही वाचा : विमानतळावरून आता २४ तास ‘बेस्ट’ सेवा! पहा वेळापत्रक… )
आरक्षण सुरू
उन्हाळी विशेष गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर बुधवारपासून खुले झाले आहे. गाड्यांची तपशीलवार माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडियावर उपलब्ध आहे. उन्हाळी विशेष गाड्यांच्या वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
Join Our WhatsApp Community