हार्बर मार्गावरून रेल्वे प्रवास करताय? ८ जानेवारीला प्रवाशांचा होणार खोळंबा

166

रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य ( मेन) मार्गावर मेगाब्लॉक नसेल.

( हेही वाचा : मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवस विशेष पॉवर ब्लॉक! लोकल गाड्यांवर होणार परिणाम)

ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • मध्य रेल्वे मार्गावर दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
  • ठाणे-वाशी/नेरुळट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल.
  • ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि
    वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत आणि
    चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.०४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा गाड्या राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.०७ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल.

या रविवारी मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर मेगाब्लॉक नसेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.