उपनगरी रेल्वेमार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, १४ जानेवारीला तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गांवरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे, तर बोरिवली आणि अंधेरीकडे जाणाऱ्या काही गाड्या हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील, तर काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द राहतील.
(हेही वाचा – Jammu and Kashmir : पुंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनावर हल्ला)
हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द अप-डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या वाशी, बेलापूर, पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा, वाशी, बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वांद्रे, गोरेगावदरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकारनुसार चालवल्या जातील याशिवाय ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्ददरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
मध्य रेल्वेमार्गावर ठाणे-कल्याण पाचव्या, सहाव्या अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ३.४० वाजेपर्यंत सहाव्या मार्गावर धावणाऱ्या अप मेल, एक्सप्रेस गाड्या कल्याण, दिवा आणि विद्याविहारदरम्यान जलद अप – जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर पाचव्या मार्गावर चालणाऱ्या डाऊन मेल, एक्सप्रेस गाड्या विद्याविहार आणि दिवा, कल्याणदरम्यान डाऊन मार्गावर वळवल्या जातील तसेच दोन्ही दिशेने निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community