रविवारी प्रवाशांचे हाल! तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

98

उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरूस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यंदाच्या रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : मुलीच्या नावे जमा होणार ५० हजार रुपये! जाणून घेऊया ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेविषयी…)

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी १०.५५ ते ४.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक
  • या ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. तसेच चर्चगेट ते गोरेगावदरम्यान धावणाऱ्या काही लोकल सेवा रद्द असतील. याशिवाय ब्लॉक कालावधीत माहिम स्थानरांवरील रि-अलाइनमेंटचे काम पूर्ण होताच सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल माहिम स्थानकांवर थांबतील.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

  • भायखळा- माटुंगा (शनिवार/रविवार रात्री) जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ४.३० पर्यंत आणि जलद मार्गावर मध्यरात्री ००.४० ते पहाटे ५.४० पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५.२० वाजता सुटणारी जलद गाडी भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवली जाईल व वेळापत्रकानुसार निर्धारित थांब्यावर थांबेल.
  • हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक
  • पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई साठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.