Sunday Megablock : रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या मेगाब्लॉक अपडेट

140

मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी मेगाब्लॉक आहे.

( हेही वाचा : …अखेर ‘विराट’चे ७१ वे शतक! रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला)

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत माटुंगा- मुलुंड धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
  • ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)
  • पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

विशेष गाड्या

  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागामध्ये विशेष उपनगरी (लोकल) ट्रेन चालविण्यात येतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
  • ब्लॉक कालावधीत बेलापूर/ नेरुळ – खारकोपर लाईन सेवा उपलब्ध असतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.