प्रवाशांचा खोळंबा! रविवारी लोकलच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर १३ जानेवारी २०२२ रोजी देखभालीचे काम करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना प्रवाशांनी नियोजन करून बाहेर पडावे, असे आवाहन रेल्वेमार्फत करण्यात आले आहे.

( हेही वाचा : T20 World Cup : भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू निवृत्ती घेणार? सुनील गावस्करांचे सूचक वक्तव्य)

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

 • माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुनश्च जलद मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
 • ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

 • पनवेल- वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक
  (बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित होणार नाही)
 • पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
 • पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

विशेष गाड्या

 • ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
 • ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
 • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागांत विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

हे मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here