रविवारी बाहेर पडताय? दोन्ही मार्गावर असणार मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

133

मध्य रेल्वे मार्गावर रविवार दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : MSRTC : प्रवाशांच्या खिशाला कात्री; दिवाळीनिमित्त ‘एसटी’ची हंगामी भाडेवाढ! या तारखेपासून होणार लागू…)

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत माटुंगा ते ठाणे धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
  • कल्याण येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या ठाणे ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील, ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबून पुढे माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • पनवेल – वाशी हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
    (बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित नाही)
  • पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

विशेष गाड्या

  • ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार धावतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

हे मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.