मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर रविवारी मेगाब्लॉक असणार नाही. मात्र हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघाला दणका! नेमके काय आहे प्रकरण? )
हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
- ठाणे-वाशी/नेरुळ ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
- ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या मार्गावरील गाड्या आणि
वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाणे करता सुटणाऱ्या मार्गावरील गाड्या रद्द राहतील. - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
विशेष गाड्या
- तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.
- रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी मेन लाईनवर मेगा ब्लॉक नाही.
हा मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community