Sunday Megablock : रविवारी बाहेर पडताय? ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक!

117

रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : पुणे महापालिका भरती; ‘या’ दिवशी घेण्यात येणार परीक्षा)

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत माटुंगा- ठाणे धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबतील.
  • कल्याण येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील गाड्या ठाणे आणि माटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
  • सकाळी 11.00 ते 5.00 या वेळेत सीएसएमटीहून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.

विशेष गाड्या 

  • तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.