Sunday Megablock : रविवारी प्रवाशांची होणार गैरसोय; पहा मेगाब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक!

मध्य रेल्वेवर रविवार दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांचा प्रवास होणार सुकर; लवकरच बीआरटी मार्ग विकसित करणार)

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • माटुंगा – मुलुंड जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
  • ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत जलद गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

विशेष गाड्या

  • ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
  • पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देखभाल मेगाब्लॉक आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here