मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागामध्ये २ ऑक्टोबर २०२२ रोजी देखभालीचे काम करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघूनच आपला दिनक्रम ठरवा.
( हेही वाचा : रेल्वेच्या UTS ॲपला प्रवाशांची पसंती; दुप्पट तिकीट बुकिंग )
रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- माटुंगा – मुलुंड मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत जलद मेगाब्लॉक असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
- ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत जलद गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- पनवेल- वाशी हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक (नेरुळ/बेलापूर-खारकोपर लाईन वगळून)
- पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
- पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत प्रवाशांना सुविधा
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.
- ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर गाड्या सुरू असतील.
- ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ – खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.हा मेगाब्लॉक मेंटेनन्स व पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.