Sunday Megablock : रविवारी लोकल प्रवास करण्याआधी जाणून घ्या मेगाब्लॉक अपडेट!

90

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • माटुंगा – मुलुंड जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
  • ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या गाड्या मुलुंड येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक
    (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)
  • पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.

विशेष गाड्या 

  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
  • ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.