मध्य रेल्वे मार्गावर रविवार 9 ऑक्टोबर 2022 रोजी मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
रविवारी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत ठाणे – कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
- कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिरा पोहोचेल.
(हेही वाचा – मध्य रेल्वेचा दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, कसं असणार गाड्यांचं वेळापत्रक)
हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
विशेष गाड्या
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि वाशी -पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.