रविवार १३ मार्चला मध्य रेल्वे मार्गावर, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहे.
( हेही वाचा : लांब पल्लयाच्या गाड्यांसाठी आता आचारसंहिता, वाचा! )
या मार्गांवर असणार मेगाब्लॉक
- सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठाणे ते कल्याण जलद मार्गावर
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.१६ ते सायंकाळी ४.१७ या वेळेत सुटणाऱ्या जलद रेल्वेगाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील. या रेल्वेगाड्या त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने संबंधित स्थानकांवर पोहोचतील.
- कल्याण येथून सकाळी ८.४० ते सायंकाळी ४.५८ पर्यंत सुटणाऱ्या जलद/अर्ध जलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या रेल्वेगाड्या त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
- कुर्ला ते वाशी या हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.५४ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात येणार आहे.
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
प्रशासनाने केली व्यक्त दिलगिरी
हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community