रविवारी ‘या’ मार्गावर जाऊ नका! मेगाब्लॉक असणार आहे

103

येत्या रविवारी सुद्धा प्रवाशांचे मेगाब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी रेल्वच्या तिन्ही मार्गावर रविवारी 6 मार्च 2022 रोजी मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक

मध्य रेल्वेमार्गावरील दिवा ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत ठाणे येथून सकाळी 8.37 ते सायंकाळी 4.36 पर्यंत सुटणाऱ्या गाड्या दिवा आणि कल्याण स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या डोंबिवली स्थानकात थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.

( हेही वाचा : मुंबईकरांसाठी लवकरच सुरू होणार नवीन रेल्वे स्थानक! )

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई / वडाळा रोड स्थानकातून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यत वाशी/बेलापूर/पनवेलकरता सुटणाऱ्या आणि सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे /गोरेगाव करिता सुटणाऱ्या गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.
  • पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/ वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द केल्या जातील.
  • ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत असणार आहे.

या ब्लॉक कालावधीत सर्व लोकल ट्रेन चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेली आहे.

whatsapp

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.