पोलिस निरिक्षक सुनील माने निलंबित!

मनसुख हिरेन संशयित मृत्यू प्रकरणी एनआयएने गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील माने याला अटक केली होती.

एनआयएकडून अटक करण्यात आलेल्या सुनील माने याला पोलिस दलातून निलंबित करण्यात आले. शुक्रवारी पहाटे माने याला अटक करण्यात आली होती. मनसुख हिरेन प्रकरणात वाझेची मदत केल्याच्या प्रकरणात त्याला अटक केली होती. सुनील माने सशस्त्र पोलिस दलात होता.

मनसुख हिरेन संशयित मृत्यू प्रकरणी एनआयएने गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील माने याला अटक केली होती. त्यानंतर त्याला शुक्रवारी, २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास एनआयए स्पेशल कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा एनआयए कोर्टाने सुनील मानेला २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. मनसुखला हत्येच्या दिवशी फोन करणारा विनायक शिंदे नसून सुनील मानेच होता. त्यानेच फोन करून मनसुखला हत्येच्या दिवशी बोलावले होते, मनसुखच्या हत्येवेळी माने हा घटनास्थळी होता, अशी माहिती एनआयएने कोर्टात दिली.

(हेही वाचा : सुनील मानेला २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी!)

मनसुख संशयित मृत्यू प्रकरणातील तिसरी अटक!

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन संशयित मृत्यू प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिस दलातील पोलिस निरीक्षक सुनील मानेला गुरुवारी रात्री अटक केली. मनसुख हत्या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. मुकेश अंबानीच्या घराजवळ मिळून आलेली स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मृतदेह मुंब्रा खाडीत मिळून आला होता. मनसुख यांची हत्या करण्यात आली, असा आरोप एनआयएचा आहे. या आरोपातील सचिन वाझे हा मुख्य आरोपी असून त्याला मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी सचिन वाझे याला मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटचे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने याने मदत केली होती. या प्रकरणी मानेला राज्यांच्या एटीएस पथकाने चौकशीला बोलावले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here