
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून यान पृथ्वीवर परत आणल्याबद्दल भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी अंतराळातून परतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि स्पेसेक्सचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांचे आभार मानले. दोघांनीही नासाच्या अंतराळवीरांच्या सुरक्षिततेवर विश्वास व्यक्त केला. टेक्सासमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये (NASA Johnson Space Center) आयोजित पत्रकार परिषदेत सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी, “पृथ्वीवर परत आल्यानंतर त्यांना बरे वाटत आहे. त्या सध्या पुनर्वसनातून जात आहे आणि नवीन आव्हानांसाठी सज्ज होत आहे. घरी परतताच मला माझ्या नवऱ्याला मिठी मारायची होती. मी सर्वात आधी ग्रिल्ड चीज सँडविच खाल्ले.” असे त्यांनी म्हटले.
( हेही वाचा : IPL 2025, MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम, एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय)
सुनीता (Sunita Williams) पुढे म्हणाल्या, “अवकाशातून हिमालय आणि भारताच्या इतर भागांचे रंग पाहून मला फार आश्चर्य वाटले. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी भारत पाहणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता.” असे त्यांनी यावेळी सांगितले. सुनीता विल्यम्स (Sunita Williams) म्हणाल्या की, “जेव्हा त्या त्यांच्या जोडीदार विल्मोरसोबत अंतराळात अडकल्या होत्या तेव्हा ती ‘टनेल व्हिजन’सह काम करत होती आणि फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत होती. आम्हाला माहित नव्हते की पृथ्वीवर काय चालले आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अंतराळ संशोधनाच्या संदर्भात अंतराळ उद्योगाला अनेक उद्दिष्टे साध्य करायची आहेत. सुनीता विल्यम्स यांनी कबूल केले की अंतराळवीरांना दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे शारीरिक आव्हानांना तोंड द्यावे लागते. मात्र, पुनर्वसन कार्यक्रमांद्वारे या आव्हानांना तोंड देता येते. स्नायूंची कमकुवतपणा आणि हाडांची झीज कमी करण्यासाठी एक विशेषज्ञ टीम असल्याचे विल्मोर यांनी यावेळी सांगितले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community