८ दिवसांच्या मोहिमेला लागले २८६ दिवस; Sunita Williams यांच्या परतीच्या प्रवासाचा खर्च किती ?

137

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर बुधवारी सुमारे ९ महिन्यांनंतर अंतराळातून स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून घरी परतले आहेत. त्यांना परतीचा प्रवास पूर्ण करण्यास जवळपास १७ तास लागले

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग आणि नासाच्या ८ दिवसांच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर गेले होते. या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाची अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याची आणि परत आणण्याची क्षमता तपासणे हा होता. प्रत्यक्षात मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांना तिथे ९ महिने म्हणजेच २८६ दिवस घालवावे लागले.

(हेही वाचा – Nagpur Violence: ११ ठिकाणी संचारबंदी कायम; १५० हून अधिक शाळा बंद)

६ जून २०२४ या दिवशी सुनीता व बुच यांचे स्टारलायनर कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झाले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुनीता आणि बुच यांच्या विना स्टारलायनर परत आणले गेले. बरेच प्रयत्न केल्यानंतर १८ मार्च २०२५ या दिवशी सुनीता आणि बुच यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.

सुनीता ज्या स्पेसएक्समधून परतल्या, त्यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला आहे. स्पेसेएक्स क्रू ड्रॅगनमध्ये सहा अंतराळवीरांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक सीटचे भाडे भारतीय चलनात ४६० कोटी रुपये आहे. स्पेसएक्सच्या क्रू-९ मिशनच्या चार जागांचे भाडे जवळपास १८४० कोटी रुपये आहे. यामध्ये संपूर्ण मोहिमेचा खर्च समाविष्ट नाही.

अंतराळ स्थानकातून निघालेले यान जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते, त्याला रिएन्ट्री म्हणतात. यान अंतराळात २८ हजार किमी प्रति तास प्रवास करते. पृथीवर येताना त्याचा वेग कमी होतो. अंतराळवीरांना घेऊन येणारे ड्रॅगन कॅप्सुल रिएन्ट्रीनंतर जमिनीपासून काही किलोमीटर अंतरावर असताना त्याचे पॅराशूट उघडले गेले. यामुळे कॅप्सुल स्थिर राहण्यास मदत होते. पॅराशूट उघडले गेल्यानंतर कॅप्सुल नियोजित वेगाने पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले. (Sunita Williams)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.