निवासी संकुले उभारण्यात सनटेक रियल्टी लिमिटेडची संयुक्त भागीदारी!

बोरीवली (पश्चिम) येथील 7 एकर जमिनीवर आलिशान निवासी प्रकल्प विकसित करणार.

सनटेक रियल्टी लिमिटेड हा मुंबईतील बीएसई आणि एनएसई सूचीबद्ध मालमत्ता विकासक असून त्यांनी बोरीवली (पश्चिम) येथील 7 एकर जमीन संपादित केला आहे. सनटेक रियल्टी लिमिटेडला विशेष निवासी जागेवर आलिशान निवासी प्रकल्प विकसित करायचा आहे. जेएलएल इंडिया संयुक्त भागीदारीकरिता खास व्यवहार भागीदार होता.

7 एकर जागेवर निवासी प्रकल्प!

हा निवासी प्रकल्प असेट लाईट जेडीए मॉडेल अंतर्गत संपादित करण्यात आला असून तो पश्चिम उपनगरातील शहरात 7 एकर जागेवर वसलेला असून सुमारे 1 दशलक्ष चौ.फू. विकास क्षमता आहे. आगामी 4-5 वर्षांत या प्रकल्पातून सुमारे रुपये 1,750 कोटींची निर्मिती होण्याचा अंदाज असून त्यामुळे बळकट रोख प्रवाह तसेच कंपनीच्या आर्थिक ताळेबंदीला चालना मिळेल. या प्रकल्पामुळे दूरवर विस्तीर्ण पसरलेले बोरीवली कांदळवने तसेच गोराईपर्यंतचा ग्लोबल विपश्यना पॅगोडा व त्यापलीकडच्या भागाचे दर्शन घडेल. जागतिक दर्जाची निवासी उत्पादने निर्माण करण्यात सनटेक ब्रँडने सातत्य राखले आहे. आम्ही आलिशान राहणीमानात सर्वोत्तम दर्जाच्या बांधकाम आणि विकास क्षमतांचे दर्शन घडवू. मायक्रो-मार्केटमध्ये स्वत:ची छाप उमटवणारा आमचा प्रयत्न आहे, असे सनटेक रियल्टी लिमिटेडचे अध्यक्ष कमल खेतान यांनी सांगितले.

तयार घरांच्या खरेदीकडे कल वाढलाय!

गृह कर्जावरील दरात ऐतिहासिक कपात झाली, रियल इस्टेट क्षेत्रात सरकारने आणलेल्या सवलती त्याचप्रमाणे परवडणाऱ्या किंमती यामुळे मागील काही महिन्यांपासून ग्राहकांचा तयार घरांच्या खरेदीकडे कल वाढलेला दिसून येतो. नवीन शुभारंभ तसेच बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांत ग्राहक रस दाखवत असल्याचे चित्र दिसते, असे मत जेएलएल इंडिया, लँड अँड डेव्हलपमेंट सर्विसेस (पश्चिम भारत) सिनियर डायरेक्टर अँड हेड, निशांत काब्रा यांनी मांडले. बोरीवली पश्चिम हा भाग मुंबईच्या पश्चिम उपनगरात मोडत असून ते सर्वोत्तम निवासी घरांचे केंद्र बनले आहे. या शहराला रस्ते/रेल्वेची चांगली जोड आहे तसेच सामाजिक पायाभूत सुविधा देखील उत्तम आहेत. त्याशिवाय आगामी काळात इथे दहिसर ते डीएन नगरला जोडणारी, पुढच्या काळात विविध मार्गिकांनी अन्य शहरांना जोडणारी 2A मेट्रो लाईन येते आहे. या मेट्रो विकासासोबत सागरी मार्ग प्रकल्प मायक्रो-मार्केटमध्ये परिवर्तनाची लाट आणेल. प्रवासाला लागणाऱ्या वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असल्याने इथे अधिक आकर्षक निवासी आणि व्यावसायिक केंद्र म्हणून नावारूपाला येत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here