‘Pankaja Munde पराभूत झाल्या, तर जीव देईन’ म्हणणाऱ्या समर्थकाचा बस अपघातात मृत्यू

शुक्रवार, ७ जून रोजी रात्री अहमदपूर-अंधोरी रस्त्यालगत असेलल्या बोरगाव पाटी येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाची बस रिव्हर्स घेतांना सदर सचिन कोंडिबा मुंडे (Sachin Kondiba Munde) मागे असल्याचे चालकाला दिसले नाही.

417
'Pankaja Munde पराभूत झाल्या, तर जीव देईन' म्हणणाऱ्या समर्थकाचा बस अपघातात मृत्यू
'Pankaja Munde पराभूत झाल्या, तर जीव देईन' म्हणणाऱ्या समर्थकाचा बस अपघातात मृत्यू

बीड लोकसभेच्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा निवडणुकीत पराभव झाला, तर मी जीव देईन, असे सांगणारा एका कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्यक्तीचा शुक्रवार, ७ जून रोजी बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ही आत्महत्या असू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

शुक्रवार, ७ जून रोजी रात्री अहमदपूर-अंधोरी रस्त्यालगत असेलल्या बोरगाव पाटी येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाची बस रिव्हर्स घेतांना सदर सचिन कोंडिबा मुंडे (Sachin Kondiba Munde) मागे असल्याचे चालकाला दिसले नाही. त्यामुळे चिरडले गेलेल्या ३८ वर्षीय सचिन कोंडिबा मुंडे यांचा मृत्यू झाला. तो लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील येस्तर या गावचा रहिवासी होता.

(हेही वाचा – Modi 3.0: पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच मोदींचे शेतकऱ्यांना खास गिफ्ट!)

बसचालकाला झाली अटक

ज्या बसमुळे अपघात झाला, त्याच्या चालकाला अटक करण्यात आले आहे. मुंडेंचा मृत्यू अपघातामुळे झाला कि ही आत्महत्या होती, याचा तपास सुरू आहे. येलदरवाडी येथे रात्री मुक्कामी आलेली बस बोरगाव पाटी येथे थांबली होती. बस रिव्हर्स घेत असताना मागे उभा असलेला सचिन बसखाली चिरडला गेला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. किनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी भाऊसाहेब खंदारे या अपघाताची चौकशी करत आहेत. सदर बस तपासासाठी जप्त करण्यात आली आहे.

या कार्यकर्त्याने सांगितले होते की, बीड लोकसभेच्या (beed lok sabha constituency) भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा निवडणुकीत पराभव झाला, तर मी जीव देईन. प्रत्यक्षातही लोकसभा निवडणुकीला पहिल्यांदाच उभ्या राहिलेल्या पंकजा मुंडे यांना पराभव सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी त्यांचा ६,५५३ मतांनी पराभव केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.