Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली, पुढील सुनावणी २४ जानेवारीला

ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर पार पडली होती.

151
Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली, पुढील सुनावणी २४ जानेवारीला
Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली, पुढील सुनावणी २४ जानेवारीला

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.

याविषयी सविस्तर माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने २४ जानेवारीला पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे. याचा अर्थ क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारले आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल.’

(हेही वाचा – RBI : वाढत्या महागाईबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला ‘अलर्ट’ राहण्याचा इशारा, वाचा सविस्तर…)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर पार पडली होती. त्यामुळे या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती.

खुल्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता…
मराठा आरक्षणाच्या याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता २४ जानेवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.