‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) या शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (YouTuber Ranveer Allahabadia) याला खडसावले आहे. तसेच त्याला अटकेपासून संरक्षण देत पोलिसांकडे पासपोर्ट (Passport) जमा करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. (Supreme Court)
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात रणवीर याने अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर चौफेर टीका झाल्यानंतर हा कार्यक्रम यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. रणवीर अलाहाबादिया याने माफीही मागितली आहे. तसेच त्याच्याविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
(हेही वाचा – BMC Hospitals : झिरो प्रिस्क्रिप्शनसाठी निधीची तरतूदच नाही !)
दरम्यान, प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्या. सूर्यकांत (Justice Suryakant) आणि न्या. एन. कोटेश्वर सिंह (Justice N. Koteshwar Singh) म्हणाले की, त्याच्या मनात घाण आहे, ती यूट्यूब शोमध्ये उधळली गेली. समाजाची मूल्ये कोणती आहेत?’ त्याची तुम्हाला माहिती आहे का? असे प्रश्न उपस्थित करत ‘समाजात काही स्वयं-विकसित मूल्ये असतात. तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे असेही न्यायालयाने बजावले.
तुम्ही वापरलेल्या शब्दांमुळे पालकांना लाज वाटली. बहिणी आणि मुलींना लाज वाटेल, संपूर्ण समाजाला लाज वाटेल. यावरून असे दिसून येते की तुमचे मन विकृत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही समाजाच्या नियमांविरुद्ध काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा देतानाच सध्या इतर कोणताही कार्यक्रम करता येणार नाही. तसेच ठाणे पोलिसांकडे पासपोर्ट जमा करावा, असा आदेशही दिला.
अलाहाबादिया तपासाला सहकार्य केले तर अटक करू नये. त्याला कोणत्याही प्रकारे धमकावले जात असेल तर तो पोलीस संरक्षणाची मागणी करू शकतो. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम करत नाही, तोपर्यंत ही सवलत असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
(हेही वाचा – बिहारमधील आरा स्टेशनवर प्रवाशांकडून Sampoorna Kranti Express ची तोडफोड)
वाद काय आहे?
रणवीर अलाहाबादियाने स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या (Stand-up comedian Samay Raina) ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये पाहुणा म्हणून भाग घेतला होता. या कार्यक्रमात त्याने एका स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या लैंगिक जीवनाबद्दल एक वादग्रस्त प्रश्न विचारला. रणवीरच्या या अश्लील प्रश्नाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ती पाहिल्यानंतर लोक त्याच्यावर संतापले. अनेक मोठ्या निर्मात्यांनी रणवीरवर टीका केली आहे. काही सेलिब्रिटींनी त्याच्या पॉडकास्टचे आमंत्रण रद्द केले आहे.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियाने जर्सीवर छापले पाकिस्तानचे नाव)
रणवीर अलाहाबादिया कोण आहे?
रणवीर अलाहाबादियाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे ‘बियर बायसेप्स’ नावाचे यूट्यूब चॅनेल आहे, ज्यावर तो पॉडकास्ट चालवतो. रणवीरच्या पॉडकास्टमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार्स दिसले आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community