कोणत्याही परदेशी संस्थेतून एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रम करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना नीट यूजी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार नाही. असा निर्णय एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. (MBBS)
राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (National Eligibility-cum-Entrance Test) NEET UG परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थी परदेशातून एमबीबीएसचा अभ्यास करू शकत नाहीत. परदेशातून वैद्यकीय अभ्यासक्रम घेण्यासाठी NEET UG पात्रतेची वैधता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. परदेशी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम घेण्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) उत्तीर्ण होणे अनिवार्य करणाऱ्या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमाला सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहे. (MBBS)
हेही वाचा-Marathi Language : मायबोली मराठीची समृद्ध प्राचीन परंपरा आणि आधुनिक काळातील आव्हाने…
न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, ‘हा नियम निष्पक्ष, पारदर्शक आहे आणि कोणत्याही वैधानिक तरतुदींशी विरोधाभासी नाही. NEET UG उत्तीर्ण होण्याची आवश्यकता पदवीधर वैद्यकीय शिक्षण नियम, १९९७ मध्ये विहित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करतो.’ सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती बीआर गवई आणि के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. (MBBS)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community