अनिल देशमुखांच्या वाढल्या अडचणी! अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार

या याचिकेवरील पुढील सुनावणी ३ ऑगस्टला होणार आहे. मात्र त्याआधी २ ऑगस्ट रोजी देशमुख यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर व्हावे लागणार आहे.

81

ईडीने चौकशीसाठी तीन वेळा समन्स पाठवूनही माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे जाणीवपूर्वक टाळत होते. त्यानंतर देशमुख यांनी ईडीच्या अटकेच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शुक्रवारी, ३० जुलै रोजी न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडी आता देशमुख यांना केव्हाही अटक करू शकते.

२ ऑगस्ट रोजी देशमुखांना ईडीच्या चौकशीला हजर व्हावे लागणार!

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘अनिल देशमुख पोलिसांना बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश देत होते’, असा आरोप केला. त्या पार्श्वभूमीवर ईडीने मनी लॉन्डरिंग प्रकरणी देशमुख यांना समन्स बजावले होते. या प्रकरणी देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने समन्स बजावले आहेत. गेल्यावेळी अनिल देशमुख यांनी प्रकृती स्वास्थाचे कारण देत ईडीच्या चौकशीला जाण्यासाठी टाळले होते. ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स पाठवले असून २ ऑगस्ट रोजी त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

(हेही वाचा : हिंदुस्थान पोस्टच्या बातमीचा इम्पॅक्ट, ‘त्या’ शेल्टरच्या कामाला लवकरच सुरुवात)

सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण नाही!

दरम्यान देशमुख यांनी ईडीकडून अटक होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर ३० जुलै रोजी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने देशमुख त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ ऑगस्टला होणार आहे. मात्र त्याआधी २ ऑगस्ट रोजी देशमुख यांना ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.