मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलांनी सनातन धर्मावरील वक्तव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली असून स्टॅलिन आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.याशिवाय स्टॅलिन यांनी यापुढे कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचनाही देण्याचीही मागणी केली आहे.
सनातन धर्माविरोधातील सर्व सभांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी धर्माविरुद्ध बोलण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सभा आयोजित करण्याच्या सर्व प्रस्तावित योजनांवर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. चंद्रचूड यांनी लवकर सुनावणीसाठी ई-मेल करण्याच्या सूचना केल्या आहेत.
(हेही वाचा : Adulterated with Palm Oil : पामतेलात ब्रँडेड खाद्यतेलाचे इसेन्स टाकून भेसळ, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरू)
याआधी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि खासदार ए राजा यांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. उदयनिधी स्टॅलिन आणि खासदार ए राजा यांच्यावर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली आणि चेन्नईच्या पोलीस आयुक्तांवरही अवमानाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वकील विनीत जिंदाल यांनी सनातन धर्माविरोधात द्वेषयुक्त भाषण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community