युट्यूबर Ranveer Allahabadia याला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

51

युट्यूबर रणवीर इलाहाबादिया (Ranveer Allahabadia) याला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. न्यायालयाने आता अलाहाबादिया याला दोन आठवड्यांनी येण्यास सांगितले आहे. ‘जर पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला, तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

(हेही वाचा – पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर Sunita Williams यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, मला माझ्या नवऱ्याला…)

न्यायालयाने आणखी एक युट्यूबर आशिष चंचलानी (Ashish Chanchalani) याला पासपोर्ट देण्यासही नकार दिला. या सर्वांवर ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (india’s got latent) या स्टैंड-अप कॉमेडी शोमध्ये अश्लील टिप्पण्या केल्याचा आरोप आहे. शो दरम्यान, काही लोकांनी पालकांबाबत अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

रणवीर इलाहाबादिया यांच्या रोजीरोटीवर होणाऱ्या परिणामाचा हवाला देत पासपोर्ट (Passport) सादर करण्याच्या अटीत सुधारणा करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली होती. यावर न्यायालयाने म्हटले की, त्याचे दोन पैलू आहेत. जर आम्ही तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी दिली, तर चौकशीवर परिणाम होईल आणि ती पुढे ढकलली जाऊ शकते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणात सांगितले की, तपास पूर्ण करण्यासाठी आणखी २ आठवडे लागतील. यानंतर न्यायालयाने अलाहाबादिया (Ranveer Allahabadia) याला दोन आठवड्यांनी येण्यास सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.