सुमारे चार- पाच वर्षापूर्वी कोरोना विषाणूने (COVID-19 Vaccines) जगभरात थैमान घातला होता. त्यावेळी भारतात लसीकरण (COVID-19 Vaccines) मोहिम हातात घेण्यात आली. मात्र याच कोरोनाच्या लसीमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो, असे काहींचे म्हणणे होते. या लसीमुळे (COVID-19 Vaccines) शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाल्याचा दावाही अनेकांकडून करण्यात आला. याबाबत एक याचिका ही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना फटकार लगावले आहेत. तसेच सरन्यायाधीश चंद्रचुड (Dhananjaya Yeshwant Chandrachud) यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
( हेही वाचा : AAP सरकारचा दुटप्पीपणा; दिल्लीत फटाक्यांवर बंदी, पंजाबमधील प्रदुषणाकडे मात्र दुर्लक्ष)
सरन्यायाधीश चंद्रचुड म्हणाले की, केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या याचिका दाखल केल्या जातात. जर लसीकरण (COVID-19 Vaccines) झालं नसतं तर त्याचे काय दुष्परिणाम झाले असते, याचाही विचार आपण केला पाहिजे, असे ही सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांनी फटकारले. याचिकाकर्ते प्रिया मिश्रा आणि आलोक मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत त्यांनी लसीकरणामुळे (COVID-19 Vaccines) शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दावा केला होता. तसेच लसीकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सुनावणीस नकार दिला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community