Hijab Ban : मुंबईच्या महाविद्यालयांतील हिजाब बंदी परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

126
Hijab Ban : मुंबईच्या महाविद्यालयांतील हिजाब बंदी परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Hijab Ban : मुंबईच्या महाविद्यालयांतील हिजाब बंदी परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, नकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच न्यायालयाने महाविद्यालय प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर देखील मागवले आहे. (Hijab Ban)

(हेही वाचा – चूक झाली, माफ करा; नाशिकच्या सभेत Ajit Pawar यांनी दिली कबुली)

मुंबईतील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे (Chembur Trombay Education Society) एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी परिधान करण्यास बंदी घातली आहे. महाविद्यालयाच्या निर्णयाविरुद्ध नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, उच्च न्यायालयाने २६ जून २०२४ रोजी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर विद्यार्थिनींनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या सर्व याचिकाकर्त्या विद्यार्थिनी विज्ञान शाखेच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत.

दरम्यान कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारता येतो का? असा प्रश्न न्यायालयाने महविद्यालयाला विचारला आहे. (Hijab Ban)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.