Krishna Janmabhoomi : श्रीकृष्ण जन्मभूमीचे सर्वेक्षण करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

132
Krishna Janmabhoomi : श्रीकृष्ण जन्मभूमीचे सर्वेक्षण करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Krishna Janmabhoomi : श्रीकृष्ण जन्मभूमीचे सर्वेक्षण करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी (Krishna Janmabhoomi) वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला मशिदीच्या सर्वेक्षणावर निर्णय घेण्यास सांगितले आहे, पण श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने दि. २२ सप्टेंबर रोजी नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद न्यायालयाच्या १० जुलैच्या निकालाला आव्हान देणारे अपील फेटाळून लावले, ज्यात मथुरेतील एका दिवाणी न्यायाधीशाच्या आदेशात कोणतीही त्रुटी किंवा बेकायदेशीरपणा आढळून आला नाही. श्रीकृष्ण जन्मभूमी वैज्ञानिक सर्वेक्षणासाठीच्या अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी मथुरा दिवाणी न्यायाधीशांना निर्देश देण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला ट्रस्टने आव्हान दिले होते. त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘आम्हाला असे वाटते की, उच्च न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्याने घटनेच्या कलम १३६ नुसार, आम्हाला अधिकार क्षेत्र वापरण्याची गरज नाही.’

(हेही वाचा – Nagpur Flood : नागपूर पुरावरुन टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर बावनकुळेंचा हल्लाबोल; म्हणाले …)

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने याआधी उच्च न्यायालयात सर्वेक्षणाबाबत याचिका दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली. त्यानंतर ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण आता श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.