Surat Diamond Bourse : ‘सुरतमधील हिरे बाजारातून देशात १,५०,००० लोकांना रोजगार मिळेल’ 

सुरतचा हा हिरे बाजार आहे ६७ लाख वर्ग फुटांचा. 

203
Surat Diamond Bourse : ‘सुरतमधील हिरे बाजारातून देशात १,५०,००० लोकांना रोजगार मिळेल’ 
Surat Diamond Bourse : ‘सुरतमधील हिरे बाजारातून देशात १,५०,००० लोकांना रोजगार मिळेल’ 
  • ऋजुता लुकतुके

सुरतचा हा हिरे बाजार आहे ६७ लाख वर्ग फुटांचा. (Surat Diamond Bourse)

गुजरातमध्ये सुरतजवळ खजोड गावात उभा राहिलाय देशातील पहिला मोठा हिरे बाजार (Diamond market). ६७ लाख वर्गफूट इतक्या मोठ्या जागेवर वसलेला हा बाजार ही जगातील सगळ्यात मोठी कार्यालयीन जागा आहे. ‘या जागेतून येणाऱ्या दिवसांत दीड लाखांची रोजगारनिर्मिती होईल,’ असं रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जगाला सांगितलं. (Surat Diamond Bourse)

दीड लाख लोकांना रोजगार

ते सुरतमध्ये हिरे बाजार तसंच सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. हिरे बाजाराच्या प्रकल्पावर ते खुश होते. आताच सुरतचा हिरे बाजार (Diamond market) आठ लाख लोकांना रोजगार देतो. आता नवीन बाजाराच्या स्थापनेनंतर आणखी दीड लाख लोकांना रोजगार मिळेल, असं सरकारचं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिने उद्योगात सुरत हिरे बाजार (Diamond market) एक मापदंड असेल. जगातील ही सगळ्यात मोठी कार्यालयीन जागा आहे, असा दावा पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही करण्यात आला आहे. (Surat Diamond Bourse)

६७ लाख वर्गफुटांवर वसलेल्या या बाजारात ४,५०० दुकानं आहेत आणि १४० लिफ्ट आहेत. कच्चे हिरे, पैलू पाडलेले हिरे तसंच दागिने यांच्या देवाण घेवाणीसाठी जगातील हे एक आधुनिक आणि सुसज्ज केंद्र असेल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. (Surat Diamond Bourse)

(हेही वाचा – Geert Wilders: हिंदूंना माझा नेहमीच पाठिंबा, नेदरलँड्चे नेता गीर्ट वाइल्डर्स यांचे महत्त्वपूर्ण विधान)

किरकोळ खरेदीदारांसाठी ज्वेलरी मेल

हिरे आणि दागिन्यांच्या आयात-निर्यातीसाठी सीमाशुल्क विभागाकडून लागणारी परवानगी या केंद्रात मिळू शकते. त्यासाठी बाहेर जावं लागणार नाही. किरकोळ खरेदीदारांसाठी ज्वेलरी मेल असेल. तर आंतरराष्ट्रीय बँक व्यवहार आणि सेफ वॉल्टही एकाच इमारतीत उपलब्ध असेल. अशा एकत्र सुविधा असलेला जगातील हा सगळ्यात मोठा बाजार असल्याचं बोललं जात आहे. (Surat Diamond Bourse)

मुंबईतील हिरे बाजार सुरतला हलवल्याचा आरोप गेले काही महिने नरेंद्र मोदी सरकारवर होत होता. (Surat Diamond Bourse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.