धर्मशास्त्रासह शस्त्रशिक्षणही काळाची गरज; इस्कॉनचे आचार्य Surdas Maharaj यांचे विधान

61
धर्मशास्त्रासह शस्त्रशिक्षणही काळाची गरज; इस्कॉनचे आचार्य Surdas Maharaj यांचे विधान
धर्मशास्त्रासह शस्त्रशिक्षणही काळाची गरज; इस्कॉनचे आचार्य Surdas Maharaj यांचे विधान

आम्ही धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले पण आता शस्त्रशिक्षण ही काळाची गरज आहे. गीता, ज्ञानेश्वरी तरुणांनी वाचायला हवी, त्यापासून प्रेरणा मिळते. कारण गीता सांगते अन्याय होत असेल तर शस्त्र हाती घ्यायला हवे. त्यामुळे अधर्माची लढाई लढायची असेल तर शस्त्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच भारतातील महापुरुषांचे विचार तरुणांच्या नसानसात सळसळले पाहिजे, असे विधान खारघर इस्कॉनचे (ISKCON) प्रमुख आचार्य सुरदासजी महाराजांनी (Surdas Maharaj ) केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

( हेही वाचा : Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटींची तरतूद

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच यांच्या सहयोगाने ‘बांगलादेश सद्य परिस्थिती आणि भविष्य’ या विषयावर स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून वीरमाता अनुराधा गोरे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar), स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर यांच्यासह अनेक श्रोते उपस्थित होते.

यावेळी आचार्य सुरदासजी महाराज (Surdas Maharaj ) म्हणाले की, भारतीयांनी संस्कृती रक्षणासाठी सज्ज झाले पाहिजे. आपल्या मुलांना मोबाईलवरील गेम, बॉलीवुडमधील गाणी ऐकवण्यापेक्षा महापुरुषांची माहिती द्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांची धर्मनिष्ठा, त्यांचा त्याग, क्षात्रतेज आपल्या मुलांच्या नसानसातून वाहिले पाहिजे. तसेच भौतिक शिक्षणावर अवलंबून न राहता वैदिक शिक्षणही घेतले पाहिजे, असे ही आचार्य म्हणाले.

दरम्यान आचार्य सुरदासजी महाराजांनी स्व:नुभवातून काश्मीरी पंडितांच्या व्यथेला वाट मोकळी करून दिली. तसेच बांगलादेशात इस्कॉनच्या मंदिरातील धर्मांधांकडून होणारी तोडफोड, गाईंची कत्तल याबद्दल कटू अनुभवही सांगितले. त्यामुळे आम्ही संयमी आहोत पण संयमालाही अंत आहे. आम्ही ही शस्त्र हाती घेऊ शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे असा इशारा ही त्यांनी बांगलादेशातील धर्मांधांना दिला. त्याचबरोबर संस्कृतीसोबत खेळ करू नका. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात इस्कॉन सर्वार्थाने प्रतिकार करत आहे. राक्षसांनी तिकडे उतपात माजवला असला तरी एकावेळी राक्षसांचा संहार होईल, हे निश्चित, असे म्हणत. भारत हा विश्वगुरू होता, असणार आणि राहिलं, असे ही आचार्य यावेळी म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.