‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘घटेंगे तो मिटेंगे’; Suresh Chavhanke यांचा हिंदूंना सतर्कतेचा इशारा

43
'बटेंगे तो कटेंगे' आणि 'घटेंगे तो मिटेंगे'; Suresh Chavhanke यांचा हिंदूंना सतर्कतेचा इशारा
'बटेंगे तो कटेंगे' आणि 'घटेंगे तो मिटेंगे'; Suresh Chavhanke यांचा हिंदूंना सतर्कतेचा इशारा

आम्हाला शिलालेखावर नाही तर काळाच्या कपाळावर नाव कोरायचे आहे. भारतासमोरील सर्वात मोठी समस्या वाढती मुस्लिम लोकसंख्या आणि घटती हिंदूंची संख्या ही आहे. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे आणि घटेंगे तो मिटेंगे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे राजकीय लढाईचा  ५ वर्षांसाठीचा संघर्ष संपला परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठी अस्तित्वाची लढाई सुरु राहिलं. कारण हिंदुत्ववादी सरकार आले असले तरी हिंदूंचे हे शेवटचे सरकार ठरणार नाही, यासाठी काम करणे गरजेचे आहे, असे सुरेश चव्हाणके (Suresh Chavhanke) म्हणाले.

(हेही वाचा : मुस्लिमबहुल मतदारसंघात BJPचा हिंदू उमेदवार विजयी, ११ मुस्लिम उमेदवारांचा पराभव

तसेच TISS चा अहवाल हिंदूंच्या लोकसंख्येबाबत जे भाष्य करतो. ते पाहता हिंदूंच्या हाती फक्त १० वर्षे आहेत. त्यामुळे आता सत्ता परिवर्तन झाले पण सामाजिक परिवर्तन व्हायला हवे, असे विधान सुरेश चव्हाणके (Suresh Chavhanke) यांनी केले. सुरेश चव्हाणके हे सिविल सोसायटी ऑफ महाराष्ट्र संयोजक आणि सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि  स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) हे उपस्थित होते.

पुढे चव्हाणके (Suresh Chavhanke) म्हणाले की, महाराष्ट्रात हिंदूत्व चालते…महाराष्ट्र हिंदुत्ववादी होऊ शकतो, हे आपण निकालातून दाखवून दिले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या भूमीत आपण राहतो, हे आपले भाग्य आहे. त्यामुळे आताच महाराष्ट्रातील हिंदूंना जागे केले, तर महाराष्ट्र वाचेल. कारण नुकतेच झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार स्थापन झाल्यामुळे तिथले १५ ते २० टक्के नोकरदार नोकरी सोडत आहेत. कारण तिथे मुस्लिम मौलवी उद्योगपतींना धमकावून मुस्लिम तरुणांना नोकरी देण्याची मागणी करत आहेत. आज महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि गणेश नगर नाव असणाऱ्या शहरातील हिंदूंनी कधीच पलायन केलेले आहे. त्यामुळे हिंदूंनी जागे होणे गरजेचे आहे, असे विधान सुरेश चव्हाणके (Suresh Chavhanke) यांनी केले. विधानसभेतील विजयानंतर हिंदू कार्यकर्त्यांना पुढील रणनीतीच्या दृष्टीकोनातून आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

हिंदूंची घटती लोकसंख्या हा चिंतेचा विषय : मंजिरी मराठे

विधानसभेत वोट जिहादला आपण धर्मयुद्धाने उत्तर दिले. मात्र हे धर्मयुद्ध व्यापक करण्याची हीच योग्य वेळ आहे. हिंदूंची घटती लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे तरुणांनी जागृत व्हायला हवे. तसेच थुंकी जिहादसारखी प्रकरणे रोखण्यासाठी आणि व्यापार जिहाद थांबवण्यासाठी ओम प्रमाणपत्राद्वारे आपल्या व्यवसायाची नोंदणी हिंदू व्यापाऱ्यांनी करायला हवी. ओम प्रमाणपत्रामुळे हिंदू विक्रेत्याची माहिती लोकांना मिळेल आणि जिहादी कृत्यांना आळा बसेल. घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी त्यांच्या पैसापाणी मिळवण्याच्या घटकांवर घाला घातला पाहिजे. आजघडीला मंदिराबाहेर व्यावसाय करणाऱ्यांमध्ये ४० ते ५० टक्के हिंदू नाहीत. अशावेळी ओम प्रमाणपत्र व्यवसाय वृद्धीसाठी आणि धर्मयुद्धासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे अस्तित्वाच्या लढाईसाठी ओम प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी केले. (Manjiri Marathe)

विजयानंतरही हिंदूंनी अस्तित्वाची लढाई कायम ठेवावी : रणजित सावरकर
विजयानंतरही हिंदूंनी अस्तित्वाची लढाई कायम ठेवावी : रणजित सावरकर

विजयानंतरही हिंदूंनी अस्तित्वाची लढाई कायम ठेवावी : रणजित सावरकर

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले की, महायुतीतील भाजपाला विजय मिळालेल्यापैकी ८० जागांवर भाजपाच्या उमेदवाराला २० हजारांचे मताधिक्य मिळाले. पूर्वी या मतदारसंघात भरघोस मतांनी हेच उमेदवार विजयी झाले होते. इतकचं काय तर बेहरामपाडा इथे शिवसेना उबाठा पक्षाचे वरुण सरदेसाई यांच्यासाठी मौलवींनी फतवे काढले. त्यामुळे विजयानंतरही हिंदूंनी अस्तित्वाची लढाई कायम ठेवायला हवी. आज पैसे, व्यापार मुसलमानांच्या हाती आहे, ही परिस्थिती बदलायला हवी. धर्मयुद्धासाठी हिंदूंनी एकत्र यायला हवे. त्यामुळे आपले पैसे कोणत्या व्यापाऱ्याला द्यायचे हे आपण ठरवायला हवे. विधानसभेतील विजयानंतर जोमाने काम करायला हवे आणि हिंदूंनी ओम प्रमाणपत्र सर्वत्र पोहचवायला हवे, असे रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.(Ranjit Savarkar)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.