गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात 4 जहाल नक्षलवाद्यांनी दि. ३ फेब्रुवारी रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. अशोक पोच्या सडमेक उर्फ बालन्ना, वनिता दोहे झोरो, साधू लिंगु मोहंदा उर्फ शैलेश (Shailesh) आणि मुन्नी पोदिया कोरसा (सुकमा-छत्तीसगड) (Sukma-Chhattisgarh) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. (Gadchiroli)
( हेही वाचा : Maharashtra State : सरकारी कार्यालयांत आता मराठीतच बोला; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय)
यापैकी अशोक सडमेक हा चार्मोशी व अहेरी दलमचा कमांडर होता. त्याचप्रमाणे त्याच्यावर टेक्निकल टीमची जबाबदारी होती. त्याच्यावर चकमक, जाळपोळ असे एकूण 82 गुन्हे दाखल आहेत. तर वनिता दोहे झोरे हिच्यावर चकमक आणि जाळपोळीसह 11 गुन्हे दाखल आहेत. साधू लिंगु मोहेंदा भास्कर हिचामीचा अंगरक्षक होता. साधू याच्यावर 4 गंभीर गुन्हांची नोंद आहे. तर जनताना सरकार स्कूलमध्ये शिक्षीका असलेली मुन्नी पोदिया कोरसा बासागुडा दलमची सदस्य असून ती सप्लाय टीममध्ये कार्यरत होती. (Gadchiroli)
राज्य सरकारने 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह (Maoists) अनेक जहाल माओवाद्यांनी (Maoists) आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 695 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. (Gadchiroli)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community