तुम्ही घेतलेल्या लसीचा प्रभाव अजूनही आहे का?

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. सरकारने बूस्टर डोसही घोषित केला आहे. पण तुम्ही घेतलेली लस अजूनही कीती प्रभावी आहे आणि कोरोना प्रादुर्भावापासून तुमचे किती संरक्षण होऊ शकेल? हे पाहणे गरजेचे झाले आहे. आपण घेतलेली लस ही शरीरात किती प्रभावी आहे. याबाबत बनारस हिंदू विद्यापीठाने सर्व्हे केला आहे. या सर्व्हेसाठी 116 लोकांचे सॅम्पल घेण्यात आले.

बनारस हिंदू विद्यापीठाचा सर्व्हे

  •  केवळ 17 टक्के लोकांमध्येच प्रतिपिंडे आढळून आली.
  • अॅंटीबाॅडीजचे प्रमाण कमी होत असले, तर ते निश्चितच गंभीर आहे. लसीचा प्रभाव कमी होत असल्याचे हे द्योतक आहे.

सध्या कोरोनाची स्थिती काय

  • देशात सध्या कोरोनाचे 15 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
  • राजधानी दिल्लीसह हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांत रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे.
  • आयआयटी मद्रासमध्येही 55 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अलीकडेच निष्पन्न् झाले.

( हेही वाचा: आता सव्वा तासात औरंगाबादहून गाठा पुणे, असा असणार नवा मार्ग! )

लशीचा प्रभाव शरीरात किती? कसे जाणून घ्याल?

  • घेतलेल्या लशीचा शरीरात किती प्रभाव आहे हे पाहण्यासाठी अॅंटीबाॅडी टेस्ट करावी लागते.
  • रक्ताचे नमुने घेऊन ही चाचणी केली जाते. रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात.
  • अहवालानंतर अॅंटीबाॅडीज शरीरात किती आहेत, याचा पत्ता लागतो. त्यावरुन लसीचे डोस शरीरात कार्यरत आहेत किंवा कसे, हेही समजते.
  •  अॅंटीबाॅडीजसाठी 500 ते 1000  रुपये खर्च येतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here