NIA : एटीएसने पुण्यातून अटक केलेले संशयित एनआयएच्या ताब्यात

125

एटीएसच्या पुण्यातील पथकाने पुण्यातून अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांचा ताबा एनआयए घेतला आहे. या संशयितांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, कादिर पठाण, एसएन काझी आणि झुल्फिकार अली बडोदावाला असे एनआयएने एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. खान आणि साकी हे मूळचे मध्यप्रदेश राज्यातील असून ‘अल सुफा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. अल सुफा ही संघटना इसिस संघटनेचा एक भाग असून हे पुण्यातील कोंढवा येथून सर्वात प्रथम या दोघांना संशयित हालचालीवरून एटीएसच्या पुणे पथकाने अटक केली होती.

(हेही वाचा PM Narendra Modi : फिल्डिंग विरोधकांनी लावली; आम्ही चौकार-षटकार मारले – पंतप्रधान मोदी)

या दोघांचे दिल्ली येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात देखील नाव आल्यामुळे त्यांचा एनआयएने ताबा घेतला. दरम्यान या दोघांना सर्वतोपरी मदत करणारे इतर संशयितांचा एटीएसकडून ताबा घेण्यात आला आहे, ताबा घेण्यात आलेल्या सर्व संशयितांना एनआयएकडून अटक करण्यात आलेली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते, अटक करण्यात आलेल्या संशयितांची पुढील योजना काय होती, तसेच त्यांच्या निधीचा स्रोत आणि त्यांच्या परदेशी हँडलरची ओळख शोधण्यासाठी एनआयएकडून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात आली, न्यायालयाने सर्व संशयितांना १४ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.