महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या मंडईतील गाळे तथा भाडेवाढीस तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. मंडईतील सर्व गाळयांच्या परवाना नुतनीकरणाच्या शुल्कात दरवर्षी ५ टक्के वाढ करण्यात येते. दरवर्षी आकारण्यात येणारे हे शुल्क सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांतही लागू करण्यात येत असल्याने व्यापारी संघ, व्यापारी असोशिएशनच्या मागणीनुसार या भाडेवाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. परंतु गाळे तथा दुकानांच्या भाड्यात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. (Market)
मुंबईतील गाळे तथा दुकानांची मासिक भाड्यामध्ये वाढ करण्याकरता जुलै २०२२ मध्ये मंजुरी प्राप्त झाली असून महापालिका मंड्यांमधील वेगवेगळ्या असोशिएशनकडून भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. स्टॉल होल्डर्स असोशिएशन, लोकमान्य टिळक मंडई, संत गाडगे महाराज मंडई फळ व्यापारी संघ, दि मुंबई फ्रेश डिलर्स असोशिएशन, संत गाडगे महाराज मंडई फळ विभाग व्यापारी असोशिएशन यांच्याकडून जानेवारी २०२३ मध्ये वाढीव मासिक भाड्याबाबत मंडई असोशिएशनने विरोध दर्शवला आहे. तसेच १ सप्टेंबर २०२२ पासून वाढीव मासिक भाडे आकारणीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही भाडेवाढ रद्द करावी म्हणून आमदार आशिष शेलार यांनी डिसेंबर २०२३ मध्ये पत्र दिले होते. (Market)
मागील काही वर्षांपासून परवाना नुतनीकरण शुलक यामध्ये प्रतिवर्षी १० टक्के वाढ होत असून नवीन परिपत्रकाप्रमाणे मासिक भाड्यामध्ये दरवर्षी ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ जास्त प्रमाणात आहे. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये शेलार यांच्यासमवेत प्रशासनाची बैठक पार पडली. यामध्ये भाडेवाढ व दंडासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकाचा अभ्यास करून सुधारीत प्रस्ताव फेरविचारासाठी तात्काळ सादर करावा अशाप्रकारचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये सन २०२३-२४ या वर्षांकरता मासिक चौरस फुट भाडेदर कायम ठेवून १ एप्रिल २०२४ पासून पुढील प्रत्येक वर्षांकरता ५ टक्के वाढ ही तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील आदेश प्राप्त होईल सन २०२३-२४ मध्ये असलेल्या प्रचलित चौरस फुट दरानुसार परवानाधारकांकडून १ एप्रिल २०२४ पासून पुढील कालावधीकरता मासिक भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १ एप्रिल २०२४ पासून पुढील प्रत्येक वर्षांकरता ५ टक्के दर वाढ ही तात्पुरती स्वरुपात स्थगिती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता मंडईतील गाळे तसेच दुकानदारांकडून नुतनीकरणाचे वार्षिक ५ टक्के शुल्क आकारणीला स्थगिती दिली असली तरी प्रत्यक्षात यांच्या चौरस फुट दरामध्ये ५० टक्के वाढ करून परवानाधारकांकडून सुधारीत दरानुसार भाडे आकारले जाणार आहे. (Market)
(हेही वाचा – Monsoon Session : अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
मंडईतील गाळे तथा दुकानांच्या चौरस फुटांसाठी असा आकारला जाणार दर
अ श्रेणी मंडई (दर चौरस फुटांमध्ये)
व्हेज :
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ : १२ रुपये
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : १२.६० रुपये
नॉन व्हेज :
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ : १३.५ रुपये
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : १४.१८ रुपये
नॉन मार्केटेबल :
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ : १८.७५ रुपये
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : १९.६९ रुपये (Market)
———————————————
ब श्रेणी मंडई (दर चौरस फुटांमध्ये)
व्हेज :
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ : १०.५ रुपये
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : ११.०३ रुपये
नॉन व्हेज :
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ ; ११.२५ रुपये
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : ११.८१ रुपये
नॉन मार्केटेबल :
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ : १५.०० रुपये
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : १५.७५ रुपये (Market)
——————————————-
क श्रेणी मंडई (दर चौरस फुटांमध्ये)
व्हेज :
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ : ०९.०० रुपये
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : ०९. ४५ रुपये
नॉन व्हेज :
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ ; ११.२५ रुपये
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : ११.८१ रुपये
नॉन मार्केटेबल :
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ : ११.२५ रुपये
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ : ११.८१ रुपये (Market)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community